अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Thursday 3 April 2014

#

Devotee Meena Vahini at Ram Janma - Ramnavami Utsav 2003

Aniruddha Ram Meena vainiLate Meena Vaihini (Meena Govind Dhabolkar (Grand Daughter in law of Saisaccharitra Writer Govind Raghunath Dabholkar known as Hemadpant)


2 comments:

 1. मी कधी मीना वाहिनिंना प्रत्यक्ष पाहिले नव्हते … फक्त त्यांचे फोटो पाहिले होते … पण तरी त्यांच्या अभंगातून त्यांची नेहमीच भेट होत आली आहे …मी कधी त्यांना "मीना वाहिनी" म्हणून नाही संबोधित … माझ्यासाठी त्या "मीना माई " किंवा "मीना आई" आहेत … आज हा २००३चा रामनवमी उत्सवातील त्यांचा वरील विडीओ पाहिला आणि अचानक डोळे भरून आलेत …. एवढी सुंदर दिसायची माझी आई … थोडी फार अशक्त दिसत आहे तरी कित्तेक पटीने गोड आणि निरागस … अगदी निर्धास्त कारण तिच्या पाठी तिचा अनिरुद्ध-साई-राम उभा आहे ….
  मीना आई वर जिव्हाळा केव्हा लागला हे मलाच माझं कळलं नाही … त्यांचे काही मोजकेच अभंग ऐकले होते पण साई निवास मध्ये बापू आल्यावर त्यांची होणारी धावपळ ऐकली होती आणि मना मध्ये त्यांच्या प्रती खूप प्रेम आणि आदर निर्माण झाला होता …
  मी कधी कोणत्या ही मंदिराला प्रदक्षिणा नाही मारत पण साई निवासच्या खाली असलेल्या तुळशी भवती माझे पाय आपोआप ३ प्रदक्षिणा घालतात … साई निवास वरून निघतांना त्यांच्या हस-या प्रतिमे कडे पाहून " येतो हा आई , next time यायला allow कर माई " असं बोलून तिची परवांगी घेतो मी …कारण तिच्या त्या पवित्र वास्तू मध्ये ती माझ्या सारख्या पापीयाला यायला देते , कारण त्या वास्तू मध्ये मीना आईची प्रेमळ नजर मला अजूनही अनुभवता येते …. मी नेहमी त्यांना मला बापूंवर कसं प्रेम करायचं हे मला शिकवण्याचा आग्रह करत असतो …. कारण तिच्या जीवनाच्या पाळण्याची दोरी तिने बापूंच्या हाती सोपवली होती म्हणून तिला कसलीच भीती नव्हती ….

  अंबज्ञ समीरदादा हा विडीओ आमच्या पर्यंत पोहोचवण्या बद्दल …।

  इथे योगींद्रसिंहांच्या अभंगातील ओव्या आठवत आहे :

  मीना ताई माय आमुची
  मूर्ती सेवा शारण्याची
  अनिरुधे योग्या आठवणीने
  गमे ना ग तूझ वीणा ………।

  स्वयेची तुळशी वृंदावन , स्वयेची तुळशी वृंदावन !!!

  श्री राम
  मी अंबज्ञ आहे
  हर्षसिंह पवार

  ReplyDelete
 2. Hariom dada, Ambadnya for sharing the video.

  मीना वैनी... ह्यांच्याबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच आहे. आपल्या देवावर प्रेम कसे करावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. कधी त्यांना बघायला तर मिळाले नाही पण बापूनी मला त्यांच्याजवळ घेतल्यापासून मीनावैनिन्बद्दल भरपूर ऐकायचे. हळू हळू त्यांचे एक एक अभंग ऐकत गेली. पण तेव्हा माझी ते सर्व समजण्याची क्षमता नसल्यामुळे मला कधी अशी खूप ओढ वाटलीच नाही. पण आज जसा जसा बापू समजायला लागला, तस तस ह्या लाडक्या मीना वैनी आणि त्यांचा ते बापुंविषयी असलेल प्रेम समजू लागल.
  त्यांचा साई परत अवतरणार हे समजल्यावर आतुरतेने त्यांची वाट पहात त्यांची भक्ती करत राहिल्या, आणि अखेरीस त्यांच्या देवाला प्रगट व्हायलाच लागलं. आणि तेच जेव्हा तो समोर आला तेव्हा वैनींची लगबग, त्यांच्या मनाची झालेली अवस्था त्यांनी त्यांच्या अभंगातूनच फार सुंदरपणे मांडली

  मला भेटण्या आला बापू, मला भेटण्या आला,
  मना न कळे काय करावे पहाताची राहिला

  तो अख्खा अभंग ऐकल्यावर सगळं काही अगदी सहजपणे डोळ्यासमोरून येउन जात आणि मग त्यांची ती तळमळ त्यांचा तो आनंद, त्यांची ती घाई, सगळं पाहून डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. त्यांच्या बाप्पावरच्या प्रेमाला आणि बाप्पाच्या ह्या माउलिवरच्या प्रेमाला खरोखर काही सीमाच नव्हती. काय त्यांचं भाग्य! देवाने मागितले आणि त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य त्यांच्या बापूंना समर्पित केले. किती थोर व्यक्तिमत्व म्हणाव!
  बापुराया तुझ्याकडे तू आम्हाला बोलावून घेऊन हे असे सर्व थोर लोकांशी आमची ओळख करून दिलीस. त्यांना परिपूर्ण करून आमच्या सारख्या पामरांसाठी मोठा आदर्श ठेवून दिलास ह्या सर्व तुझ्या भक्तांचा. इकडे येउन अनुभवले ते फक्त प्रेम आणि प्रेमच..
  खूप ऋणी आहे मी देवा तुझी!
  मीना वैनींवर काहीहि लिहिण्याची खर तर माझी क्षमताच नाही पण तरी हा एक छोटा प्रयास....

  मीना आई तू फक्त प्रेमाची मूर्ती
  माझ्या बापूंची तू ग लेक लाडकी
  कोणत्या शब्दात करू ग तुझी स्तुती
  माझा बापू हि जिथे स्वतास लपवू शकला नाही,
  अशी तू बापूंची आईच खरी
  "त्या"ची आई आणि लेक हे दोन्ही नाते सांभाळूनी
  दिलीस तू शिकवण आम्हा भक्तीची
  बापूचा हात घट्ट पकडुनी
  केलीस पार ह्या जीवनाची नदी
  तुझे आचरण आणि अभंगांच्या रचनांनी
  गाठू आम्ही बापूंची सामिप्यनगरी

  अम्बज्ञ
  - केतकीवीरा कुलकर्णी
  ReplyDelete